
टीआरएस फाऊंडेशनतर्फे आयोजन
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल सावे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (२३ फेब्रुवारी) बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने टीआरएस फाऊंडेशनतर्फे या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाटोदा परिसरातील पेरे चौका नजिक चित्रकूट व्हॅली येथील चेस लँड या ठिकाणी येत्या रविवारी (२३ फेब्रुवारी) ओपन बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी एकूण ३१ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी ३५० रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. नाव नोंदणी २१ फेब्रुवारीपर्यंत खेळाडूंनी करावी असे आवाहन टीआरएस फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम १० हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. त्यानंतर ४ ते १४ क्रमांकपर्यंतच्या खेळाडूंना देखील रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय अनेक विशेष पुरस्कार देखील ठेवण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी ९८२२५०८७३७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.