
गुलमर्ग : गुलमर्ग येथे आयोजित खेलो इंडिया विंटर गेम्स पुढे ढकलण्यात आले आहेत. पुरेशी बर्फवृष्टी न झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या एका सूत्राने सांगितले की, ‘खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचा जम्मू आणि काश्मीर टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे.’ पाचव्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचे दुसरे सत्र परिसरात अपुरी बर्फवृष्टी झाल्यामुळे पुढे ढकलण्यात आले. हवामान सुधारल्यानंतर त्याच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील.
गुलमर्गमध्ये अल्पाइन स्कीइंग, नॉर्डिक स्कीइंग, स्की माउंटेनियरिंग आणि स्नोबोर्डिंग स्पर्धा होणार होत्या. पहिला टप्पा २३ ते २७ जानेवारी दरम्यान लेह येथे खेळवण्यात आला. त्यामध्ये आइस हॉकी आणि आइस स्केटिंगच्या स्पर्धा घेण्यात आल्या.