
सात खेळाडूंना ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान
छत्रपती संभाजीनगर : मिशन मार्शल आर्ट्स अँड वुशू कुंग- फू स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडिया व यशोधन बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित मार्शल आर्ट्स कुंग-फु कराटे ग्रेड बेल्ट वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या प्रसंगी १५० खेळाडूंना ग्रेड बेल्ट परीक्षेत यश संपादन केले. तसेच ७ खेळाडूंना ब्लॅक बेल्ट पदवी प्रदान करण्यात आली.
वासंती मंगल कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. एकूण १५० विद्यार्थी मार्शल आर्टस् कराटे ग्रेड बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झाले. तसेच मार्शल आर्ट्स मध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाणारी ब्लॅक बेल्ट डिग्री ७ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. तसेच राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेत्या १७ विद्यार्थ्यांना २१५१ रुपयांची शिष्यवृत्ती मिशन मार्शल आर्ट्स संघटनेच्या वतीने देण्यात आली. तसेच गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत विजयी झालेल्या २५ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

प्रमुख पाहुणे राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक सचिन क्षीरसागर, डॉ सुरेश जंगले, रणजित पाटील, संदीप काळे, सुनील पाटील, निलेश उबाळे, प्रवीण तायडे, राजेंद्र ढेंगळे, आदिनाथ बारगजे, पाथरकार, गायिका डॉ. यशश्री करमाळकर व मिशन मार्शल आर्ट्स संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पवन घुगे, सचिव व मुख्य कराटे प्रशिक्षक प्रवीण घुगे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ग्रेड बेल्ट व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ब्लॅक बेल्ट मधील अनुश्री घुगे, यशोधन घुगे यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षिका राधा घुगे, नंदा घुगे, आरती वाघ, कोमल राठोड ऋतुजा रणवाळकर, ऋतुजा भालेराव, धनश्री सिदवाडकर, प्रशिक्षक राम बुधवंत, शाम बुधवंत,राम चौरे, गौरव टोकटे, कृष्णा कानडे. व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्कॉलरशिप मिळवणारे विद्यार्थी
धनश्री वाघ, तनुश्री घुगे, अनुश्री घुगे, समीक्षा जांभळकर, ओवी पाटील, सांची लहाने, आश्लेषा रिडलॉन, ओजस्वी बारगजे, आर अरुंधती, यशोधन घुगे, रुद्र चव्हाण, अभिजित देशमुख, अर्णव रिडलॉन, गजराज चावरिया, स्वप्नील राठोड, भव्य बगाडिया, विश्वजीत सोळुंके.
ब्लॅक बेल्ट डिग्री मिळवलेले विद्यार्थी
तनुश्री प्रवीण घुगे, धनश्री उद्धव वाघ, समीक्षा सुखदेव जांभळकर, ऋतुजा वडगावकर, स्वप्नील राठोड, विश्वजीत सोळुंके. मास्टर पवन घुगे यांना वर्ल्ड मार्शल आर्ट्स कौन्सिल नेपाळचा ७ डॅन ब्लॅक बेल्ट व प्रवीण घुगे यांना ५ डॅन ब्लॅक बेल्ट प्रमुख पाहुण्यांचे हसते प्रदान करण्यात आला.
ग्रेड बेल्ट व प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेले विद्यार्थी
ग्रेड येलो बेल्ट : मोक्षदा पाटील, श्रिया काळे, ईश्वरी कोथिंबिरे, अक्षदा भवर, वेदांती राजूरकर, शौर्या बेंद्रे, सान्वी बेंद्रे, पलक पवार, सृष्टी पदमे, रेवा महाजन, स्वराली दांडगे, हिमांशी जोशी, प्रत्युषा रोडे, गौरी मानकर, रिद्धी बियाणी, दित्या राठोड, पूजा हडुळे, नायशा कमानी, स्वरांजली ठाणगे, रुचिता मिस्त्री, प्रिशा पदमावर, अंशिका भारती, दर्शनी करोडीवाल, कार्तिका सोनवणे, सान्वी साखळकर, आमोहा पांडेय, स्वरांजली ठाणगे, निरंजन कारले, आर्यन कवडे, दिव्यांका लिंभोरे, आरोशी भानुसे, वेदिका कराळे.
येल्लो बेल्ट
अमेय धर्माधिकारी, विहान वडगावकर, हर्ष पाटेकर, वेंकटेश पेन्सलवार, तनुश शेंडे, अगस्त्य अबोटी, जयवर्धन अचलिया, अभिराज राठोड, समीर शिंदे, श्रेयश म्हेत्रे, अभिनव राठोड, वेदांत गुंजळ, आयुष जाधव, अथर्व त्रिपाठी, आयुष तिवारी, आयुष ठाणगे, श्रीरंग जाधव, दर्शन बनकर, वंश चव्हाण, आर्यन महाजन, मनीष क्षीरसागर, आर्यन कराडे, निरंजन कराळे.
ग्रेड ऑरेंज बेल्ट
कोमल फतपुरे, सान्वी देशपांडे, निशिता कोंडालवार, अनिशा जाधव, स्मिता खराबे, समिका काळे, सान्वी भुतेकर, दर्शनी करोडीवाल, आद्रीयन बॅनर्जी, प्रथम बियाणी, अर्णव सरडे, पविश देशपांडे, हर्ष देशपांडे, विहान देशपांडे, विदित देशपांडे.
ग्रेड ग्रीन बेल्ट
श्रावणी करमाळकर, नीरजा लांडे, आनंदी लांडे, तन्वी सोनुने, नंदिनी घोंगार्डे, झोहा सय्यद, ओवी पाटील, सांची लहाने, स्वनिका जैन, अर्णा गौतम, टीष्टा सिंग, रिशीत वरुडकर, नेहेते चंदन, विराज घोंगर्डे, समर्थ औताडे, यज्ञेश सोनुने, शाश्वत लहाने, रियांश खेडकर, सोहम बजाज, आधव पलानीकुमार.
ग्रेड ब्लू बेल्ट
तनुश्री राठोड, विद्या पाटील, अनुश्री तर्ट्टे, सान्वी कबले, ओजस्वी बारगजे, आर अरुंधती, गौरी घुगे, नव्या दरगड, अद्वैत कुलकर्णी, पियुष करोडीवाल, जय राठोड, ऋत्विक मुदगीळ, रेयांश वैद्य, मयूर चव्हाण.
ग्रेड पर्पल बेल्ट
श्राव्या यावले, सृष्टी ढाकणे, शरयू चाटुफळे, धनश्री सिदवाडकर, अनुष्का डोईजड, सायली गोरे, स्वरूप बनकर, वीरेंद्र राठोड, रुद्र पवार, श्रेयश बेडके.
ग्रेड ब्राऊन बेल्ट
ऋतुजा भालेराव, प्रिशा राठोड, राजेश्वरी मेढे, अर्णवी जंगले, सावी बिंगले, मानसी क्षीरसागर, इश्मिता गाडगे, शौर्या मोरे, ऋतुजा वडगावकर, आश्लेषा रीडलॉन, सान्वी पेडणेकर, अवनी जंगले, अनुप्रिया सुपेकर, प्राची घोरपडे, वैजेनाथ पांचाळ, विश्वजीत सोळुंके,अभिजित देशमुख, सार्थक नागे, देवांश दत्ता, शिवम वडगावकर, गजराज चावरिया, विहान शरद, अर्णव रीडलॉन, श्लोक करमाळकर, अभिनव तिडके, स्वप्नील राठोड, पार्थ ढेपे.