
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
देहरादून (गणेश माळवे) : ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिस प्रकारात महाराष्ट्र संघाने जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली. तामिळनाडू संघाने द्वितीय तर पश्चिम बंगाल संघाने तिसरे स्थान संपादन केले.
या स्पर्धेत जश मोदी,, दिया चितळे, स्वस्तिका घोष, पृथा वर्टीकर, सिद्धेश पांडे, रेगन अल्बुकर्क, चिन्मय सोमय्या, टेनिशन, तनिषा कोटेचा यांनी वैयक्तिक गटात सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची कमाई केली.
पुरुष गटात महाराष्ट्र संघाने सांघिक रौप्यपदक पटकावले. या संघात दीपित पाटील, चिन्मय सोमय्या, जश मोदी, सिद्धेश पांडे, रेगन अल्बुकर्क या खेळाडूंचा समावेश होता. महिला गटात महाराष्ट्र संघाने सांघिक रौप्य पदकाची कमाई केली. या संघात स्वस्तिका घोष, दिया चितळे, तनिषा कोटेचा, टेनिसशन, सायली वाणी या खेळाडूंचा समावेश होता. या संघाला संघ प्रशिक्षक सुनील बाब्रास, महेंद्र चिपळूणकर आणि संघ व्यवस्थापक श्रीराम कोनकर आणि गणेश माळवे यांचे मार्गदर्शन लाभले.
या शानदार कामगिरीबद्दल भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस कमलेश मेहता, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर, पथक प्रमुख संजय शेटे, स्मिता शिरोळे, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशन अध्यक्ष प्रवीण लुंकड, सरचिटणीस यतिन टिपणीस, प्रकाश तुळपुळे यांनी अभिनंदन केले आहे.