
देवगिरी महाविद्यालयामध्ये केमिस्ट्री क्विज कॉम्पिटिशन संपन्न
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे रसायनशास्त्र विभागातर्फे केमिस्ट्री क्विज कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी बीएससी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची छाननी परीक्षा घेण्यात आली. प्रत्येक वर्गातून चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर एपीजे अब्दुल कलाम संघ, विक्रम साराभाई संघ, होमी बाबा संघ आणि सर सी व्ही रमण असे चार संघ बनवून स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी पाच विविध स्तरातून प्रश्न विचारण्यात आले. प्राचार्य डॉ अशोक तेजनकर या स्पर्धेसाठी उपस्थित होते. या प्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये परिपूर्ण होण्यासाठी अशा स्पर्धा अतिशय उपयोगी पडतात असे सांगितले.
या स्पर्धेचे हे पंधरावे वर्ष चालू असून या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना नेट सेट परीक्षेसाठी तसेच उच्च शिक्षणासाठी याचा उपयोग होतो असे प्रतिपादन केले. या प्रसंगी डॉ तेजनकर यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले आणि विजयी संघास बक्षीस वितरण करण्यात आले.
या प्रसंगी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ रजिता इंगळे या उपस्थित होत्या. तसेच समन्वयक डॉ सतीश देशमुख, डॉ सुनील टेकाळे, डॉ अजित धस, डॉ दत्तात्रय पानसरे, डॉ अनंत कणगरे, आनंद धिरबस्सी आणि विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अनंत कणगरे यांनी केले व आभार मानले.