
एमपीएफ अपटाऊनमध्ये स्पर्धेचे आयोजन, टीम वन फायनान्शियल, श्याम मिल्स संघांना विजेतेपद
पुणे : एमपीएफ अपटाऊनमधील बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत वाकड, पिंपळे सौदागर, बाणेर, पाषाण भागातील मारवाडी समुदायातील १६० पेक्षा अधिक कुटुंबांनी सहभाग घेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
या वर्षी बॉक्स क्रिकेट लीगमध्ये आठ पुरुष व चार महिला संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाने केवळ क्रिकेट कौशल्य दाखवले नाही तर एकजुट व समुदाय भावना देखील प्रदर्शित केली. या स्पर्धेने सर्वांसाठी एक मोठा सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टीकोन मांडला आणि हे यशस्वी होण्यासाठी सर्व सहभागी कुटुंबांनी खूप मेहनत घेतली.
या कार्यक्रमाचे नेतृत्व अध्यक्ष शीतल भट्ट आणि संचालक पवन लाहोटी यांनी केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे यांची उपस्थिती होती. त्यांनी मनोगत व्यक्त करुन बॉक्स क्रिकेट लीग आयोजनाचे कौतुक केले. या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून स्टॅलियन्स फायनान्शियल सर्व्हिसेस यांचे सहकार्य लाभले.
या बॉक्स क्रिकेट लीग स्पर्धेत टीम वन फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या पुरुष संघाने विजेतेपद पटकावले. श्याम मिल्सच्या महिला संघाने विजेतेपद संपादन केले. दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली.
एमपीएप अपटाऊन येथील बॉक्स क्रिकेट लीग हा केवळ एक स्पोर्ट्स इव्हेंट नव्हे तर एकतेचा, संस्कृतीचा आणि सुसंस्काराचा सण होता. हा कार्यक्रम समुदायाच्या एकतेला अधिक बळकट करतो आणि भविष्यातील इतर कार्यक्रमांसाठी एक आदर्श निर्माण करतो अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.