
पुणे : राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे यांच्या वतीने पुणे ब्लाइंड प्रायमरी प्रीमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विजन क्रिकेट अकॅडमी, सिंहगड रोड येथे ही स्पर्धा झाली. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा संघटक सुनील नेवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी प्रमोद गोखले, तुषार गोसावे, दादा भाव कुटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष जनार्धन कोळसे यांनी या प्रसंगी संस्थेची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. यावेळी टी टी पंडल देखील उपस्थित होत्या.
या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चंद्रकांत खराडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे सरचिटणीस शिवाजी लोंढे यांनी प्रास्ताविक केले. ज्ञानेश्वर जन्नू यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत खराडे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रविता सोनवणे, आरती अग्रवाल, रोहित भरगुडे, निशांत माने आदींनी विशेष परिश्रम घेतले.