
महाराष्ट्र ओपन राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा
मुंबई : पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या पाचव्या महाराष्ट्र ओपन राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत मुंबईच्या एक्सलंट तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत एक्सलंट अकादमी खेळाडूंनी ५ सुवर्ण पदक, १ रौप्य पदक व ३ कांस्य पदकांची कमाई केली.
या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय स्पर्धेत २ हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ८ वर्षांखालील खेळाडू, १० वर्षांखालील खेळाडू, सब ज्युनिअर, कॅडेट, ज्युनियर व सीनियर अशा गटांमध्ये सहभागी झाले होते. ही स्पर्धा क्योरुगी व पुमसे प्रकारात स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी वर्षा लांडगे खत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत मिरा भाईंदर येथील एक्सलंट तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत नऊ पदके जिंकली.
या स्पर्धेत हार्दिक आर्य, समृद्धी जाधव, अन्विता सावंत, विदिशा करवा यांनी सुवर्णपदक पटकावले. काव्या गवंडर हिने रौप्यपदक जिंकले. सक्षम भारुड, अन्विता सावंत, विदिशा करवा यांनी कांस्यपदक संपादन केले. तसेच जान्हवी जंगम हिने उत्कृष्ट कामगिरी बजावली.
विजेत्या सर्व खेळाडूंना व राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक गजेंद्र गवंडर व कांचन गवंडर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच एक्सलंट तायक्वांदो अकादमीचे संस्थापक नीरज बोरसे, लता कलवार, ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष तुकाराम म्हात्रे, उपाध्यक्ष सलिल झवेरी, दीपक मालुसरे, सचिव कौशिक गरवालिया, खजिनदार सुरेंद्र कांबळी, सदस्य प्रमोद कदम यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.