
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील सिद्धनाथ वाडगाव येथील श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ‘धरोहर’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक भावना जपण्याचा संदेश दिला.
वार्षिक स्नेहसंमेलन ‘धरोधर’ या सामाजिक वारसा जपण्याच्या संकल्पनेवर आधारित आयोजित केला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक एकोपा बांधिलकी भावना या जपण्यासाठी विविध कलाविष्कारांचे सादरीकरण केले आणि त्यास पालकांनीही भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष वाल्मीक शिरसाट, सिद्धनाथ वाडगाव केंद्रप्रमुख शिवाजी ढाकणे, जे के राऊत, अशोक शिंदे, सुनील जाधव, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र बोर्डे, सदस्य सुनील गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी समाजातील विविध घटकावर या कार्यक्रमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने तानाजी मालुसरे, डॉ बाबासाहेब आंबेडकर, राणी पद्मावती, महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित नाटिकेने कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभरामध्ये खेळांमध्ये जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या खेळाडूंचा सत्कार देखील करण्यात आला.
आगामी काळात ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा म्हणून श्री स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल समोर येत असून येथील विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये आपले नाव चमकवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद शाळेचे अध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ यांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी सचिव प्रमोद महाजन, शिक्षिका वंदना चव्हाण, शीतल नरोडे, भाग्यश्री नरोडे, सोनाली लबडे, वंदना कैतके, किरण राजपूत, दिशा कुंढारे, मनीषा औटी, कोमल काकडे, सुप्रिया साबणे, रश्मी राजपूत, वैशाली साबणे, दीपिका वाघचौरे, अंकिता व्यास, जास्मिन खान नारायण राजपूत, विकी कहाटे, योगेश देवबोने, जोयेब पिंजारी, गजानन राऊत, रमेश चोरमारे आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.