
विविध शाळेमधील ६४२ विद्यार्थ्यांचा सहभाग
छत्रपती संभाजीनगर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, क्रीडा भारती महाराष्ट्र प्रदेश, मॉडर्न व्यायाम शाळा व सांस्कृतिक क्रीडा मंडळ अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जितो दिल्ली पब्लिक स्कूल आणि गरुड झेप सैनिकी स्कूल यांचे सौजन्याने भांगसी माता शरणापूर येथे रथसप्तमी निमित्ताने भव्य जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत पंधरा शाळेतील ६४२ विद्यार्थी आणि विविध संस्थेच्या शिक्षकांनी प्रत्येकी २४ सूर्यनमस्कार याप्रमाणे एकूण १५४०८ सूर्यनमस्कार घातले. तसेच पंतप्रधानांचे घर-घर सूर्यनमस्काराचा संकल्प पूर्णत्वास नेण्याचे दृष्टीने या माध्यमातून यशस्वी वाटचाल केली.
या जिल्हास्तरीय स्पर्धेत जितो दिल्ली पब्लिक स्कूल, गरुड झेप सैनिकी स्कूल, एनडीए गरुड झेप अकॅडमी, ज्ञानज्योत मराठी शाळा, केंद्रीय विद्यालय, रेजिमेंटल चिल्ड्रेन हायस्कूल, होली क्रॉस हायस्कूल, सरस्वती भुवन प्रशाला, महाराष्ट्र पब्लिक स्कूल, ओरियंट इंग्लिश स्कूल, छत्रपती संभाजीराजे इंग्लिश प्राइमरी स्कूल, ज्ञानप्रकाश सेमी मराठी स्कूल, श्रीराम हायस्कूल व सोनामाता बालक मंदिर या संस्थांचा सहभाग होता.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे निवृत्त बँक अधिकारी रवींद्र देशपांडे, गरुड झेप सैनिकी स्कूलचे संचालक प्रा निलेश सोनवणे, जीतो दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सावित्री डकरे, क्रीडा भारतीचे उदय कहाळेकर, योग शिक्षक देवा चित्राल, वैजनाथ डोमाळे, संजय घोंगडे व इतर सर्व योग शिक्षकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी जितो दिल्ली पब्लिक स्कूल व गरुडझेप सैनिकी स्कूल व गरुडझेप एनडीए अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सूर्य नमस्काराची प्रात्यक्षिके सादर केली. मुख्य शिक्षक देवा चित्राल यांनी सुरुवातीला सूर्यनमस्कारपूर्वी सूक्ष्म हालचाली, बटरफ्लाय, वॉर्मअप इत्यादींनी स्पर्धेची सुरुवात केली. सुरुवातीला सर्व मुलांना सूर्यनमस्काराचे विस्तृत प्रशिक्षण देऊन त्यानंतर प्रत्यक्ष सूर्यनमस्कार स्पर्धा घेण्यात आली. योग शिक्षक राधा तांबे यांनी प्रात्यक्षिक दाखविले.
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून योग शिक्षक सुनीता डोमाळे, दुर्गा दुगाने, विद्या ताकसांडे, महेंद्र रंगारी, कुणाल पिंपळे, सुरेखा गरगडे, जयमाला वाघमारे, मधुकर चव्हाण, हरिभाऊ पवार, प्रल्हाद तारगे, उत्तम ठोंबरे, जयवंत बनकर, श्रद्धा पाठक यांनी काम पाहिले.
यशस्वी स्पर्धकांना देवगिरी नागरी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण नांदेडकर, भारतीय योग संस्थानचे विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर, वर्षा देशपांडे, दिनेश देशपांडे, महर्षी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष एस एम कुलकर्णी, आरोग्य विभागाचे डॉ शकील खान, सोनामाता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तळेगावकर, क्रीडा भारतीचे संयोजक सुधीर पोतदार, जयाजी पवार, राजकिरण सोनवणे यांचे हस्ते प्रमाणपत्र, गोल्ड मेडल व भेट वस्तूंचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गरुड झेप सैनिकी स्कूल व जितो दिल्ली पब्लिक स्कूलचे शिक्षक क्रांती मॅडम, अश्विनी मॅडम ,उमेश राठोड, पल्लवी चिंचे, प्रशांत जाधव, अलका राठोड, अमोल राठोड, दीपक भोर व राठी सर यांनी परिश्रम घेतले.