राष्ट्रीय अॅडव्हेंचर फेस्टीवलमध्ये अश्विनी शहाणे, अनुश्री देशमुख, पल्लवी धबालेची चमकदार कामगिरी

  • By admin
  • February 19, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या डॉ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयातील शिखर कन्या अॅडव्हेंचर क्लब मार्फत मराठवाड्यातून ३१ व्या राष्ट्रीय अॅडव्हेंचर फेस्टिवल मध्ये गिर्यारोहकांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. 

साहसी क्रीडा प्रकारात अश्विनी शहाणे अणि अनुश्री देशमुख यांनी अनुक्रमे पहिले आणि तिसरे पारितोषिक मिळविले. स्कीईंग प्रकारात अमृता देशमुख, कोमल बागडे अणि खुशाली मधेकर यानी बाजी मारली तर सांस्कृतिक कार्यक्रमात पूजा बागडे, साक्षी बागडे अणि रुद्र ढवळे अव्वल राहिले. विजय वाघमारे यांनी ३००० फुटावरून पॅराग्लाॅयडीग केले. अश्विनी शहाणे हिला ३१  व्या राष्ट्रीय अॅडव्हेंचर फेस्टिवलची सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी होण्याचा मान मिळाला. तसेच हिमालय क्लिनिंग मिशन २०२५ चा पुरस्कार पल्लवी धबाले हिने मिळवला. एव्हरेस्टवीर डॉ. मनीषा वाघमारे यांना उत्कृष्ट टीम लीडरचा पुरस्कार मिळाला.

या अॅडव्हेंचर फेस्टिवल मध्ये भारतातून महाराष्ट्र, तामिळनाडू, हरियाणा, पंजाब, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड, गुजरात अणि गोवा आदी राज्यांतून एकूण ३७५ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. मनाली, शिमला आणि उत्तराखंड या हिम प्रदेशांमध्ये रॉक क्लाइविंग, रॅपलिंग, कमांडो रॅपलिंग, माउंटेनिअरिंग, व्हाइट वॉटर राफ्टिंग, रिव्हर क्रॉसिंग, जुमारिंग, स्नो क्राफ्ट, ट्रेकिंग, स्कीइंग, पॅरासिलिंग, टेट पिचिंग अशा विविध प्रकाराचे प्रशिक्षण देण्यात आले. 

 २०१८ मध्ये डॉ इंदिराबाई भास्करराव पाठक कला महाविद्यालयात शिखर कन्या अॅडव्हेंचर क्लबची स्थापना करण्यात आली. सह्याद्री पर्वत रांगेतील अनेक गड किल्ल्यांवर ३००० गिर्यारोहकांनी यशस्वी आरोहण केले आहे. सोबतच हिमालयातील स्टोक कांगरी शिखर अणि जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट या शिखराच्या पायथ्याशी राष्ट्रीय विक्रमासह चढाई केली, मुलींचा साहसी खेळातील सहभाग वाढवणे आणि निसर्गाचे संवर्धन करणे हे या क्लबचे मुख्य ध्येय आहे. 

मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा अॅड डॉ कल्पलता भारस्वाडकर पाटील, माणिकचंद पाहाडे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सी एम राव , डॉ इंदिराबाई भास्करराव पाठक कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुनीता बाजपाई यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी गिर्यारोहकांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *