आर्यन्स संघाचा सेंट्रल झोन संघावर डावाने विजय

  • By admin
  • February 19, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

अभिषेक जोशी, सचिन लव्हेरा, हिंदुराव देशमुख, तनय संघवी, रोहित करंजकर चमकले

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत आर्यन्स संघाने सेंट्रल झोन सीनियर संघाचा एक डाव आणि ४६ धावांनी पराभव केला.

त्रिनिटी मैदानावर हा सामना झाला. सेंट्रल झोन संघाने प्रथम फलंदाजी करताना ४१.५ षटकात सर्वबाद २३७ धावसंख्या उभारली. त्यानंतर आर्यन्स संघाने पहिल्या डावात ७३ षटके फलंदाजी करत सहा बाद ४५९ धावसंख्येवर डाव घोषित केला. सेंट्रल झोन संघ दुसऱ्या डावात ३९.४ षटकात १७६ धावांत सर्वबाद झाला.

या सामन्यात अभिषेक जोशी याने १७३ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याने सहा षटकार व २१ चौकार मारले. रोहित करंजकर याने ८६ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व नऊ चौकार मारले. तनय संघवी याने ७७ धावा काढल्या. त्याने एक षटकार व नऊ चौकार मारले. सचिन लव्हेरा याने दुसऱ्या डावात ५५ चेंडूत ५५ धावांची धमाकेदार खेळी केली. सचिनने दोन षटकार व नऊ चौकार मारले. हिंदुराव देशमुख याने ४३ चेंडूत ५५ धावा फटकावल्या. त्याने दोन षटकार व सात चौकार मारले. गोलंदाजीत सौरव मोरे याने ९४ धावांत पाच विकेट घेतल्या. तनय संघवी याने ७३ धावांत चार गडी बाद केले. वैभव तेहळे याने ६१ धावांत चार बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक : सेंट्रल झोन : पहिला डाव : ४१.५ षटकात सर्वबाद २३७ (आकाश ताकवले १५, मोहित चौधरी ५२, सौरव मोरे ४३, हिंदुराव देशमुख ४२, आदर्श बागवाले ३८, राधेया आनंदगावकर ३२, तनय संघवी ४-७३, वैभव तेहळे ४-६१, प्रतीक भालेराव १-५६, ओम माळी १-२०).

आर्यन्स : पहिला डाव : ७३ षटकात सहा बाद ४५९ डाव घोषित (पुरंजय सिंग राठोड ५४, अभिषेक जोशी १७३, रोहित करंजकर ८६, तनय कुमार १३, तनय संघवी नाबाद ७७, सुजित यादव १८, ओम माळी नाबाद १७, सौरव मोरे ५-९४, क्षितिज जैन १-८७).

सेंट्रल झोन : दुसरा डाव : ३९.४ षटकात सर्वबाद १७६ (सौरव मोरे २९, सचिन लव्हेरा ५५, हिंदुराव देशमुख ५५, आदर्श बागवाले ११, तनय संघवी ३-३६, ओम माळी २-३३, प्रतीक भालेराव ३-५१, वैभव तेहळे २-३६). सामनावीर : तनय संघवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *