
जळगाव : जळगाव शहरात गुरुवारपासून (२० फेब्रुवारी) ओपन फुटबॉल चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जळगावसह नाशिक, धुळे, बुलढाणा, अमरावती, नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश आहे.
जळगाव स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित आमंत्रितांच्या खुल्या गटातील ‘जळगाव फुटबॉल चषक’ स्पर्धेला गुरुवारपासून शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण १२ आमंत्रित संघांचा समावेश आहे.
स्पर्धेतील रोख पारितोषिके व चषक
जळगाव स्पोर्ट्स अकॅडमी मार्फत दरवर्षी जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. प्रथम पारितोषिक हे रोख २५ हजाराचे तर उपविजेता संघास रोख ११ हजार रुपयांचे पारितोषिकांसह फुटबॉल चषक देण्यात येईल. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू गोलकीपर, डिफेंडर, स्कोरर यांना सुद्धा पारितोषिके देण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी मलिक फाउंडेशनचे नदीम मलिक, डॉ मनीष चौधरी, डॉ मंदार पंडित, तांबापुरचे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू पोलिस उपनिरीक्षक भास्कर पाटील, मनोज सुरवाडे व अल्ताफ शेख, महावीर क्लासेसचे नंदलाल गादिया, रूप रंग पॅलेसचे फारुक मेमन, मकरा एजन्सीचे युसुफ मकरा, पेंट पॉईंट व नागोरी आदींचे सहकार्य मिळत आहे, अशी माहिती जळगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे फारुख शेख यांनी दिली आहे.
स्पर्धेचा तपशील
२० फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यातील संघाचे चार सामने.
२१ फेब्रुवारी : नाशिक ,धुळे, नंदुरबार, नाशिक, अमरावती यांचे चार सामने.
२२ फेब्रुवारी : उपांत्य व अंतिम फेरीचे तीन सामने खेळवले जाणार आहेत.
What to do for participating in tournament 🤝
जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्याशी संपर्क साधून याविषयी अधिक माहिती घेता येऊ शकेल.