
जळगाव : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व ऑक्वा स्पॉ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत कनिष्क वाळे, कुणाल घ्यार, गौरी बाविस्कर, तेजस वाणी, कुलदीप बच्छाव पाटील, अनुष्का पोद्दार यांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
जळगाव शहरातील कोकीळ गुरुजी मनपा जलतरण तलाव येथे शिवजयंती निमित्त आंतरशालेय जलतरण स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यात ४० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. विजयी जलतरणपटूंना राजश्री झुनझुनवाला यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा विविध गटात घेण्यात आली. यात कनिष्क वाळे, कुणाल घ्यार, तुल्य पाटील, कल्पक झोपे, गौरी बाविस्कर, काव्य पवार, रिहीका अहिरे, तेजस वाणी, प्रथमेश चंदन, द्रव्य चांदीवाल, हिमांशी पाटील, शर्वरी खैरनार, रेवती झोपे, कार्तिकी भोसले, कुलदीप बच्छाव पाटील, हितेश बोदडे, रोहन अहिरे, ज्ञानेश पाटील, सर्वज्ञ खैरनार, अनुष्का पोद्दार यांनी चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत पंच म्हणून मनोज झोपे, कामिनी बोदडे, रूपाली वाणी, ज्योत्स्ना पोतदार, पंकज भोसले, कृष्णा घुगे, प्रशांत घुगे, संजय अग्रवाल, कमलेश नगरकर यांनी काम पाहिले.