
रुद्र रेंजर्स संघ उपविजेता
छत्रपती संभाजीनगर : चार्टर्ड अकाउंटंट्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत फँटम्स टीमने विजेतेपद पटकावले. रुद्र रेंजर्स संघ उपविजेता ठरला.
चार्टर्ड अकाउंटंट्स प्रीमियर लीग स्पर्धा डे-नाईट खेळवण्यात आली. या स्पर्धेत एकूण ८ संघांचा सहभाग होता. शैलेश मुथा यांच्या फँटम्स टीमने विजेतेपद पटकावले. आशिष बाहेती यांच्या रुद्र रेंजर्स संघाने उपविजेतेपद मिळवले.
अध्यक्ष रुपाली बोथरा, उपाध्यक्ष महेश इंदाणी, सचिव अमोल गोधा, केदार पांडे, गणेश भालेराव, योगेश अग्रवाल, उमेश शर्मा, रोहन अंचलिया, पंकज कलंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या व उपविजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी नितीन पटेल, शुभम जैन, वसीम बेग, आनंद नावंदर, मोहित रुणवाल आदी उपस्थित होते.