
नाशिक : मथुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ नाशिक येथून रवाना झाला आहे.
भारतीय टेनिस क्रिकेट असोसिएशनतर्फे सहाव्या मिनी सब ज्युनिअर (१४ वर्षाखालील) राष्ट्रीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा मथुरा येथे होत आहे या स्पर्धेत महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ हे संघ सहभाग होत आहेत. महाराष्ट्रातील तिन्ही संघ भारतीय व महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या महासचिव मीनाक्षी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेत आहेत.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे महाराष्ट्र सचिव मीनाक्षी गिरी, महाराष्ट्र उपाध्यक्ष विलास गिरी, महाराष्ट्र वुमन डायरेक्टर धनश्री गिरी, महाराष्ट्र जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र संघाला मार्गदर्शक म्हणून सोमा बिरादार दर्शन थोरात, मानस पाटील, व्यवस्थापक म्हणून महेश मिश्रा, ऋतुजा तोरडमल, रोहिणी सकटे व अक्षय आरडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
महाराष्ट्र पश्चिम संघ
उबैद शाह , शुभम सूर्यवंशी, यज्ञेश पुरे, यश तुपे, दक्ष गायकवाड, जीवन शेजवळ, आर्यन पटेल, अर्णव पांचाल, शौर्य चव्हाण, धार्मिन राठोड, यशराज जाधव, नील कांबळे, गणेश गोलार.
महाराष्ट्र पूर्व संघ
देव पटेल. आवेस मलबारी, ध्रुव रोंघे, आर्यन महापती, राज गुडेकर, समर्थ गामने, . सार्थक चांदवडकर, अर्जुन मोरे, अंश वर्मा, आरुष पिंपळे, हर्ष पाटील, सचिन गोल्हार, सोहम अवताडे , हर्ष अग्रवाल.
मुंबई संघ
आदित्य धाकराव, देवेन पटेल, यश काकड, अथर्व काटे, संग्राम देशमुख, तुषार सुर्वे, शिवम बिंद, गजानन शेंडगे, नैतिक मोहोळ, पियुष कांबळे, खुशाल भामरे, संग्राम तांबे.
विदर्भ संघ
आयुष बागुल, प्रदीप कटिमानी, आर्यन जाधव, चिन्मय तावडे, रुद्र भोसले, वीर पाटील, ओम शेंडगे, आर्यन श्रीवास्तव, रुद्र शेळके, आयुष लिंगे, राजवीर गोवेकर, रुद्र कुसळकर.