
लातूर : महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रोमान तांबोळी व आरती माळी या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र महाविद्यालयाचा बास्केटबॉल खेळाडू रोमान तांबोळी याची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात बास्केटबॉल संघामध्ये निवड झाली. महाराष्ट्र राज्य अंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली या ठिकाणी होत आहेत. तसेच आरती माळी हिची निवड कबड्डी संघामध्ये झाली आहे.
महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, सेक्रेटरी बबन सरतापे, प्राचार्य डॉ माधव कोलपुके, क्रीडा संचालक डॉ गोपाळ मोघे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.