
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तेजस्विनी सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरीतून अभिवादन करण्यात आले.
क्रांतीचौक येथील शिवरायांच्या चाळीस फूट अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून या फेरीस प्रारंभ झाला. या प्रसंगी जिल्हा स्केटिंग व सायकलिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भिकन आंबे, राकेश खैरनार, कृषी कार्यालय अधिकारी सचिन पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सायकल फेरीत विविध वयोगटातील ६० नागरिक सहभागी झाले होते. क्रांती चौक येथून वाहतूक नियमांचे पालन करत निघालेले सायकलस्वार लक्ष वेधून घेत होते. पैठण गेट येथे लोकमान्य टिळक, पद्मश्री गोविंदभाई श्रॉफ यांना अभिवादन करत गुलमंडीतील द्वारकादास पटेल व औरंगपुरा येथे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुतळा, मिलकॉर्नर येथे रयतेचे राजे श्रीमंत शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
मिलिंद महाविद्यालय मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या फेरीचा समारोप करण्यात आला. सहभागी सायकलपटूंना शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली पदके, टी-शर्ट प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त प्रा चंद्रसेन चौधरी, सुरजमल धुमने, संघपाल भारसाखले, राहुल जाधव यांच्या हस्ते मेडल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तेजस्विनी सायकलिंग क्लब अध्यक्ष नीता गंगावणे, तनुश्री अंकुशे, समृद्धी अंकुशे, संजय शिंदे, विलास चव्हाण, अनिल राठोड, राजनंदिनी शिंदे, अनंत ढवळे, शामल झवर, गुंजन, दिव्या इंगळे, शुभांगी लिंगायत, महेंद्र ढेंगळे, मलिकार्जून स्वामी, गोकुळ जाधव, रमेश भालेराव, चारुशीला खंडिझोड, अथर्व कुलकर्णी, पांडुरंग लहाने, ॲड. आशा गोरे, हेमंत भावसार, संतोष तारे, आरुष देव, सचिन पांचाळ, संचिता पांचाळ, समृद्धी वार्थे, सुप्रिया ढगे, संबोधी ढगे, अनघा काळे, सांची वार्थे, संतोष हिरेमठ, मोहन, आदित्य पुंगळे, सदानंद नागापूरकर, जय दातार, अमोल जाधव आदींनी या फेरीत सहभाग घेतला होता.