
न्यू जर्सी (अमेरिका) : फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आलेल्या यू १४ श्रेणीमध्ये एनजे हबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या केसीआर एलिट ईगल्स संघाने चमकदार सांघिक कामगिरी बजावत उपविजेतेपद मिळवले.
पिंक बॉल क्रिकेट स्पर्धेत केसीआर एलिट ईगल्स संघाने चारपैकी तीन सामने जिंकून १२ गुण मिळवले. या स्पर्धेत खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश संपादन केले. या संघाला क्रिकेट प्रशिक्षक दीपाली रोकडे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. केसीआर संघाला दीपाली रोकडे यांचे मार्गदर्शन, समर्पण आणि कठोर मेहनतीची जोड मिळाली. त्यांच्या प्रशिक्षणाचे खेळाडू व पालकांनी कौतुक केले आहे.

केसीआर संघात आर्य अय्यर (कर्णधार), अमिल शाह, रिशान भंडारी, राठी दांडेकर, वरुण श्रीवास्तव, कौंदिन्य वेलीचेटी, रेयांश धर, सिद्धार्थ कृपलानी, आरव दर्जी, रित्विक वोज्जला, प्रणिल पंड्या, इथन डेव्हिड या खेळाडूंचा समावेश आहे.

या संघाचे संघ व्यवस्थापक बालसुब्रमण्यम अय्यर हे होते. तसेच संघाचे समन्वयक म्हणून राज दर्जी यांनी काम पाहिले. सॉलोमन यांनी मीडियाची जबाबदारी सांभाळली. या सर्वांनी संघाचे अभिनंदन केले आहे.