छत्रपती संभाजीनगर संघाची ७६ पदकांची कमाई 

  • By admin
  • February 20, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

ओपन राज्य तायक्वांदो स्पर्धा 

छत्रपती संभाजीनगर : पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या ओपन राज्य तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर संघाने चमकदार कामगिरी नोंदवत तृतीय स्थान संपादन केले. छत्रपती संभाजीनगर संघाने १५ सुवर्ण, २१ रौप्य आणि ४० कांस्य अशी ७६ पदकांची कमाई करत स्पर्धा गाजवली. 

छत्रपती संभाजीनगर संघाने पूमसे व क्युरेगी अशा दोन्ही प्रकारांमध्ये १५ सुवर्ण, २१ रौप्य आणि ४० कांस्यपदक अशी ७६ पदके जिंकून तृतीय स्थान पटकावले. तसेच  राज्य संघटनेतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट राष्ट्रीय स्पर्धा आयोजक विशेष पुरस्काराचा मान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देण्यात आला. संघटनेचे सचिव नीरज बोरसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. स्पर्धेसोबत स्पर्धेचे प्रशिक्षक अंतरा हिरे, कोमल आगलावे, यश हिरे यांनी तर संघ व्यवस्थापक म्हणून श्रेया पराडकर, जयेश पठारे  व रूपाली तुपारे यांनी काम पाहिले.

या राज्य अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धेमध्ये  जिल्ह्याच्या राष्ट्रीय पंच लता कलवार, शरद पवार व सोमेश नंदगवळी यांनी पंच म्हणून कामगिरी बजावली. या स्पर्धेत जिल्ह्याचा राष्ट्रीय खेळाडू करण मंदाडे याने उत्तराखंड येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याला पुरस्कार देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.

पदक विजेते खेळाडू 

पूमसे (वैयक्तिक) : अधिरा कुलकर्णी (रौप्य), नितिका राऊत (कांस्य), वीर जैस्वाल (रौप्य), वरदा पळसोकर (रौप्य), अभिनव अभंग (रौप्य), श्रद्धा पवार (कांस्य). 
टीम पूमसे : जान्हवी सातव (सुवर्ण), वेदिका शिंगाडे (सुवर्ण), ईश्वरी धस (सुवर्ण). फाईट सुवर्ण : दृष्टी कोल्हे, वेदिका पाखे, यजत कुलकर्णी, देवांश टाकळकर, आर्यन क्षीरसागर, विश्वेश लिंगायत, अदिरा कुलकर्णी, वीर जैस्वाल, प्रज्वल भोंडे, काव्या कौलवार, नेत्रा गव्हाणे, नमिश गुप्ता.

रौप्यपदक : तनिश्का महाजन, गौरी चौहान, श्रावणी तुपे, स्वरा कुलकर्णी, आरव कुलकर्णी, जान्हवी सातव, वेदिका शिंगाडे, अभिनव अभंग, आयुष चोपकर, राशी चौधरी, सृष्टी कौशल, मोक्ष संत्रे, अंशुमन गोजे, देवेश राऊत, गौरवी अवसरे, अन्वी पटेल. 

कांस्य पदक : श्रविका बनकर, अनन्या सोनवणे, शिवांश भोगले, हितेश वाघ, आकांक्षा नागरगोजे, अबोली कुलकर्णी, केतकी कुलकर्णी, ऋतुजा पाखे, ओम कवडे, हर्ष खंडावे, अथर्व भडगावकर, नितिका राऊत, यश भंडारे, अर्विका पवार, श्लोक गव्हाडे, वरदा पळसोकर, ऋग्वेदी कुलकर्णी, धनराज विभुते, शिवाय जगताप, सुधांशु आंबट, सम्राज्ञी दयनाते, वेद थोरात, आरुषी आगलावे, अनायका भारुका, रेयांश अग्रवाल, राजनंदिनी गांगवे, रुही मिश्रा, काव्या अग्रवाल, प्रेरणा माते, ईशानी गवळी, अन्वी यादव, भाविका गांगवे, वीरा कांकरिया, अनाया महाजन, वियाना खिवंसरा, वीरेंद्र कंगले.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *