जळगाव येथे हॉकी मुली संघ निवड चाचणी

  • By admin
  • February 20, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

जळगाव : मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम पिंपरी पुणे येथे १ ते ७ मार्च या कालावधीत सब ज्युनियर व ज्युनिअर मुली यांची राज्य संघासाठी निवड चाचणीचे आयोजन हॉकी महाराष्ट्रतर्फे करण्यात आले आहे.

या निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट सब ज्युनिअर व ज्युनियर हॉकी खेळाडूंची निवड चाचणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. या निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी आपल्या जन्माचा दाखला, आधार कार्ड व शाळेचा दाखला यांची प्रत घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन हॉकी महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष डॉ. अनिता कोल्हे व हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
अधिक माहितीसाठी वर्षा सोनवणे (88064 24365), हिमाली बोरोले (79856 62401) यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *