
कर्णधार सचिन लव्हेरा, शिवराज शेळकेची लक्षवेधक कामगिरी
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल झोन संघाने डेक्कन जिमखाना संघाविरुद्धच्या सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पहिल्या दिवशी सचिन लव्हेरा (८५) आणि शिवराज शेळके (७-१७) यांची लक्षवेधक कामगिरी ठरली.
या सामन्यात कर्णधार सचिन लव्हेरा याने ७२ चेंडूत ८५ धावांची धमाकेदार खेळी केली. सचिनने आठ उत्तुंग षटकार व तीन चौकार मारले. त्यानंतर शिवराज शेळके याने अवघ्या १७ धावांत सात विकेट घेत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सचिन व शिवराजच्या दमदार कामगिरीमुळे डेक्कन जिमखाना संघाला फॉलोऑनचा सामना करावा लागला.
संक्षिप्त धावफलक : सेंट्रल झोन संघ : पहिला डाव : ४२.४ षटकात सर्वबाद २१८ (सचिन लव्हेरा ८५, सौरव मोरे ४२, गौरव शिंदे ३१, शिवराज शेळके १३, यश बोरामणी ३-४२, यश क्षीरसागर २-५२, आत्मा मोरे २-५९, अथर्व शेट्टी १-१८).
डेक्कन जिमखाना : पहिला डाव : २५.१ षटकात सर्वबाद १०८ (क्रिश शहापूरकर ३३, सर्वेश सुर्वे १६, अथर्व सणस नाबाद २१, शिवराज शेळके ७-१७, गौरव शिंदे २-२७, मयंक लोढा १-३७).
डेक्कन जिमखाना (फॉलोऑन) : दुसरा डाव : ११ षटकात बिनबाद ६२ (सर्वेश सुर्वे नाबाद ४१, क्रिश शहापूरकर नाबाद १९).