
विकी ओस्तवालच्या प्रभावी कामगिरीनंतरही महाराष्ट्र ३९ धावांनी पराभूत
पुणे : बीसीसीआयतर्फे आयोजित सी के नायडू ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मुंबई संघाने महाराष्ट्र संघाचा ३९ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबई संघाकडून हिमांशू सिंग याने सामन्यात ११ तर महाराष्ट्राच्या विकी ओस्तवाल याने सामन्यात ११ विकेट घेण्याचा पराक्रम केला.
डेक्कन जिमखान क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. या सामन्यात मुंबई संघाने पहिल्या डावात सर्वबाद २४२ धावसंख्या उभारली. महाराष्ट्र संघाचा पहिला डाव १६५ धावांत गुंडाळून मुंबई संघाने पहिल्या डावात ७७ धावांची आघाडी घेत वर्चस्व प्रस्थापित केले. त्यानंतर मुंबई संघाचा दुसरा डाव १५५ धावांत रोखून महाराष्ट्र संघाने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, महाराष्ट्र संघाचा दुसरा डाव १९३ धावांत संपुष्टात आला आणि ३९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
संक्षिप्त धावफलक : मुंबई : पहिला डाव : ७० षटकात सर्वबाद २४२ (आर्यन पटणी २१, मनन भट्ट १४, प्रज्ञेश कानपिल्लेवार १२, सूर्यांश शेडगे २७, वेदांत मुरकर ७९, आयुष वर्तक ३८, विकी ओस्तवाल ५-६३, राजवर्धन हंगरगेकर २-५२, क्षितिज पाटील १-४८, शुभम मैड १-२३).
महाराष्ट्र : पहिला डाव : ६२.४ षटकात सर्वबाद १६५ (अनिरुद्ध साबळे ५०, हर्षल काटे ४६, अजय बोरुडे २६, क्षितिज पाटील ११, हिमांशू सिंग ५-५५, धनित राऊत ३-४१, राजेश सरदार १-३१, अथर्व १-१३).
मुंबई : दुसरा डाव : ५३.१ षटकात सर्वबाद १५५ (अंगकृष्ण रघुवंशी १२, आर्यन पटणी १२, वेदांत मुरकर २२, आयुष वर्तक ५९, हिमांशू सिंग १२, विकी ओस्तवाल ६-४६, क्षितिज पाटील ३-५३, शुभम मैड १-२०).
महाराष्ट्र : दुसरा डाव : ६६ षटकात सर्वबाद १९३ (अनिरुद्ध साबळे २१, सचिन धस ६५, हर्षल काटे २९, अनिरुद्ध नलावडे ३२, राजवर्धन हंगरगेकर ११, हिमांशू सिंग ६-६१, अथर्व ४-४९).