सौरव गांगुलीच्या कारला ट्रकने दिली धडक

  • By admin
  • February 21, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

चालकाने वेळेवर ब्रेक मारल्यामुळे सौरव गांगुली थोडक्यात बचावला

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी सचिव सौरव गांगुलीच्या कारला मोठा अपघात झाला आहे. या जबर अपघातात सौरव गांगुली सुरक्षितरित्या बचावले आहेत. 

सौरव गांगुलीच्या गाडीला एका भरधाव ट्रकने धडक दिली. गुरुवारी रात्री दुर्गापूर एक्सप्रेसवेवर हा अपघात झाला. त्यामध्ये सौरव गांगुली थोडक्यात बचावले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुली एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना त्याच्यासोबत हा अपघात झाला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कार अपघातात सौरव गांगुली पूर्णपणे सुरक्षित आहे. गांगुली त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासह एका कार्यक्रमासाठी जात असताना अचानक महामार्गावर एका वेगाने येणाऱ्या लॉरीने त्यांच्या गाडीला धडक दिली. परंतु, त्यांच्या चालकाने वेळेवर ब्रेक लावला. त्यामुळे सौरव गांगुलीला कोणतीही इजा झाली नाही. सौरव गांगुली पूर्णपणे सुरक्षित आहे. त्याच्यासोबतच त्याच्या ताफ्यातील लोकांची वाहने एकमेकांवर आदळली पण कोणीही जखमी झाले नाही.

सौरभ गांगुलीची क्रिकेट कारकीर्द
सौरव गांगुली १९९२ ते २००८ पर्यंत भारतासाठी क्रिकेट खेळला होता. तो भारतासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळला आहे. गांगुलीने भारतासाठी ११३ कसोटी सामन्यांच्या १८८ डावांमध्ये १६ शतके आणि ३५ अर्धशतकांसह ७२१२ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने ३११ एकदिवसीय सामन्यांच्या ३०० डावांमध्ये २२ शतके आणि ७२ अर्धशतकांसह ११३६ धावा केल्या आहेत.

याशिवाय, मध्यमगती गोलंदाज म्हणून त्याने भारतासाठी कसोटीत ३२ आणि एकदिवसीय सामन्यात १०० बळी घेतले आहेत. सौरव गांगुली सध्या आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्सशी संबंधित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *