
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इंडियन कॅडेट फोर्स यांच्या माध्यमातून व जय हिंद वेलनेस क्लब व बी एस वेलनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भांगसी माता गडावर साहसी रॅपलिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजित करण्यात आले होते.
कमांडर विनोद नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व जगदीश खैरनार यांच्या नेतृत्वाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, जवळपास ५० महिला व पुरुषांनी रॅपलिंग करून एक अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यात प्रामुख्याने कविता खैरनार, भारती मस्के, चंद्रशेखर मस्के, शरद मस्के, सोमीनाथ कळम, शारदा बोचरे या गिर्यारोहकांचा समावेश आहे.

या मोहिमेसाठी आयसीएफचे विजय पाटील, प्रदीप शेंडगे, किशोर नावकर, राहुल अहिरे, सुरज सुलाने, अल्ताफ शेख, शोहेब पठाण आदींनी परिश्रम घेतले. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे जवळपास पाच चिमुकल्यांनीही या गिर्यारोहणाचा अनुभव घेतला. त्यामध्ये आदेश व कल्याणी मस्के आदींचा समावेश होता, तसेच जान्हवी शेलार व सावी शेलार या दोन्ही आई-मुलींनी गिर्यारोहणाचा अनुभव घेतला, तसेच भरत चोपडे व जया चोपडे, राजेश पट्टेवार व पल्लवी पट्टेवार, अश्विनी सदाशिव, अॅड गोरे, शिरसाट, योगिता मुळे, अर्चना, रामेश्वर मोरे, चव्हाण, गजानन आदी गिर्यारोहकांचा समावेश होता.