
छत्रपती संभाजीनगर : भारतीय सोफ्टबॉल महासंघ आणि महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन अंतर्गत अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित राष्ट्रीय पुरुष व महिला वरिष्ठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी गणेश बेटूदे यांची महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संतोष आवचार व भीमा मोरे यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.

अमरावती येथील विभागीय क्रीडा संकुलात वरिष्ठ पुरुष-महिला राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धा होणार आहे. सुवर्णपदक विजेत्या महाराष्ट्र ज्युनिअर संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक गणेश बेटूदे यांची महाराष्ट्र राज्य पुरुषांच्या संघ व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली. तसेच एनआयएस प्रशिक्षक राष्ट्रीय सॉफ्टबॉल पंच संतोष चंद्रकांत आवचार व भीमा मोरे यांची या स्पर्धेत पंच म्हणून निवड झाली आहे. यापूर्वी संतोष आवचार यांनी गुजरात, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश, ओडिशा, पुरी, कर्नुल, छत्रपती संभाजीनगर, नांदयाल, जळगाव येथे राष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणून भूमिका बजावली आहे.

या निवडीबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे उपाध्यक्ष आणि राज्य सॉफ्टबॉल संघटनेचे सचिव डॉ प्रदीप तळवेलकर, राज्य संघटना सहसचिव गोकुळ तांदळे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ दत्ताभाऊ पाथ्रीकर, उपाध्यक्ष डॉ फुलचंद सलामपुरे, सचिव गोकुळ तांदळे, डॉ उदय डोंगरे, डॉ पंढरीनाथ रोकडे, डॉ दयानंद कांबळे, डॉ संदीप जगताप, दीपक रुईकर, राकेश खैरनार, क्रीडा अधिकारी अक्षय बिरादार, रायझिंग स्टार स्कूलचे अध्यक्ष सुभाष निकम, सचिव अरुण निकम, मुख्याध्यापिका दीपाली वाकळे, उपमुख्याध्यापक संदीप चव्हाण, स्वाती निकम, सागर रूपवते, प्रवीण शिंदे, सचिन बोर्डे, भीमा मोरे, अजित झा, रफिक जमादार, स्वप्नील गुडेकर आदींनी निवडीबद्दल अभिनंदन केले.