
छत्रपती संभाजीनगर : चंदीगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय वुशू स्पर्धेसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महिला व पुरुष संघ रवाना झाला आहे.
चंदीगड मोहाली येथे २२ ते २७ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय वुशू स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी फुलंब्री येथे झालेल्या अंतर महाविद्यालयीन वुशू स्पर्धेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ निवडण्यात आला.
विद्यापीठाच्या महिला संघात शुभांगी भालेराव (के के डी महाविद्यालय, कन्नड), दुर्वा अहिरे (विवेकानंद कॉलेज, छत्रपती संभाजीनगर), अमृता आवारे (आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालय, बीड), मेघा पवार (शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बीड), मुक्ताई सुरासे (देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), सायली किरगत (मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), श्रुती पुजारी (मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
विद्यापीठाच्या पुरुष संघात शेख सोहेल (हंबर्डे महाविद्यालय, आष्टी), सुरेश राऊत (हंबर्डे महाविद्यालय, आष्टी), पवन वंजारे (विवेकानंद कॉलेज, छत्रपती संभाजीनगर), ओम जगताप (हंबर्डे महाविद्यालय, आष्टी), गणेश भोणे (पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), बासलीले फरहान (शरदचंद्र महाविद्यालय, धाराशिव), विष्णू कुमटकर (हंबर्डे महाविद्यालय, आष्टी), श्रीराम पऱ्हे (शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर), निनाद देशपांडे (मोरेश्वर कला,वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय, भोकरदन), विशाल धोत्रे (हंबर्डे महाविद्यालय, आष्टी), निलेश भवरे (राजीव गांधी महाविद्यालय, करमाड), आकाश जाधव (मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर) या खेळाडूंचा समावेश आहे.
या संघाचे प्रशिक्षक म्हणून सुमित खरात (देवगिरी ग्लोबल अकॅडमी) यांची निवड करण्यात आली आहे. निवडण्यात आलेल्या संघाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संचालक डॉ संदीप जगताप, क्रीडा मंडळ सदस्य सुरेश मिरकर, सचिव महेश इंदापुरे यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.