
छत्रपती संभाजीनगर : कन्नड येथील दौलतरत्न क्रीडा मंडळातर्फे शिवजयंतीनिमित्त तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात आली.
रविवारी (२३ फेब्रुवारी) कन्नड तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. कन्नड तालुक्यातील खेळाडूंनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन दौलतरत्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी करावी. तसेच प्रत्येकी दुहेरी जोडीसाठी चारशे रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे. खेळाडूंना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बॅडमिंटन खेळाडू तालुका क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष व तहसीलदार विद्याचरण कवडकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्रवीण शिंदे यांनी दिली.