सोलापूर : सोलापूर जिल्हा पुरुष व महिला गटाची जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा बुधवारी (२६ फेब्रुवारी) येथील हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेतून अहिल्यानगर येथे १३ ते १६ मार्च दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहेत. इच्छुक संघानी आपली नोंदणी तांत्रिक समितीचे सचिव उमाकांत गायकवाड (९८८१३२३०६०) यांच्याकडे मंगळवारी (२५ फेब्रुवारी) सकाळी दहा वाजेपर्यंत नोंदणी शुल्क रुपये पाचशे भरून करावी. नोंदणी फी थकीत असलेल्या संघाचे नाव भाग्य पत्रिकेत टाकण्यात येणार नाही. या स्पर्धेची लॉट्स मंगळवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता टाकण्यात येईल.
पुरुष संघासाठी राजेश विजय शाबादी यांच्या स्मरणार्थ शाबादी परिवारातर्फे महिलांसाठी उद्योजक रेवणसिद्ध बिज्जरागी व गणेश कोळी यांच्यातर्फे फिरता करंडक देण्यात आले आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संघानी भाग घ्यावा, असे आवाहन सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर व सरचिटणीस ए बी संगवे यांनी केले आहे.