
नागपूर : श्री संताजी शिक्षण विकास संस्था द्वारा संचालित संताजी महाविद्यालयातील उदय लेंडे याला आठव्या रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ‘काता’ या प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
ही स्पर्धा बंग सभागृह, साईनगर, हिंगणा रोड, नागपूर येथे संपन्न झाली. तसेच खासदार क्रीडा महोत्सवामध्ये १९ ते २१ वयोगटात ६६ च्या वर खुल्या ‘कुमिते’ या प्रकारात उदय याने कांस्यपदक पटकाविले. ही स्पर्धा नागपूर येथील मानकापूर विभागीय स्टेडियम येथे संपन्न झाली होती. उदय लेंडे याला क्रीडा विभाग प्रमुख प्रा डॉ संजय खळतकर यांचे सहकार्य तर डॉ प्रिया वंजारी यांचे मार्गदर्शन लाभले आहे.