
नागपूर : महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेद्वारे आयोजित ६१व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत नागपूरचा सागर चापले याने पाचवे स्थान पटकाविले.
मुंबई जवळील संक रॉक लाईट हाऊस ते गेट वे ऑफ इंडिया या खुल्या समुद्री जलतरण स्पर्धेते ५ किलोमीटर हे लांब पल्ल्याचे अंतर अवघ्या ४५ मिनिटात पूर्ण करीत यश संपादन केले. संघटनेचे सचिव राजू पालकर यांनी मेडल्स प्रमाणपत्र, गौरव चिन्ह आणि रोख रक्कम १५०० रुपये देऊन त्याचा सत्कार केला.
सागर स्थानिक शार्क ॲक्वाटिक स्पोर्टिंग असोसिएशन मध्ये एनआयटी जलतरण तलावर नियमित सराव करतो स्पर्धे अगोदर त्याने अंबाझरी आणि खिडसी तलाव येथे सराव केला. जलतरण प्रशिक्षक संजय बाटवे यांचे मौलिक मार्गदर्शन त्याला लाभत आहे.
क्लबचे अध्यक्ष प्रदीप केचे, डॉ ज्ञानेश ढाकुलकर डॉ अभय राजगिरे संदीप वैद्य मिडलँड स्पोर्ट्सचे संचालक प्रशांत उगेमुगे, उपाध्यक्ष ऑपरेशन्स मिडलँड प्रीती लांजेवार, मॅनेजर ऑपरेशन मिडलँड स्पोर्ट अश्विन जनबंधू यांनी सागरनी केलेल्या सहासिक कार्याचे कौतुक करून त्याच्या उज्वल यशाची कामना केली आहे.