
नवी दिल्ली : उत्तराखंड येथे झालेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत साम्बो या खेळाने पदार्पण केले. या खेळातील सहभागी खेळाडूंना हरियाणा ऑलिम्पिक असोसिएशनचे माजी सरचिटणीस आणि साम्बो फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस राम शर्मा यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
उत्तराखंड राज्यातील वंदना स्टेडियम येथे साम्बो फेडरेशन ऑफ इंडिया व उत्तराखंड आयोजन समितीच्या सहकार्याने साम्बो या खेळाची स्पर्धा झाली. या प्रसंगी स्पर्धा संचालक व्ही एन पारसून हे उपस्थित होते. साम्बो फेडरेशन ऑफ इंडियाचे सरचिटणीस राम शर्मा यांनी खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले.