
पुणे : आगामी एन्ड्युरन्स आफ्रो-आशियाई इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी द अकॅडमी स्कूलच्या सहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
एन्ड्युर्स राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक ६८५ पदके जिंकून सांघिक विजेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत द अकॅडमी स्कूलच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवत चमकदार कामगिरीसह पदके जिंकली आहेत. त्यात आहना कुलकर्णी हिने दोन कांस्य, आर्या शिंदे हिने एक रौप्य, दोन कांस्य, श्रीनिवास अरवली एक कांस्य, दिव्या सरकार एक कांस्य, नप्पिनई आर हिने दोन कांस्य, कीर्तीश्री आर हिने एक कांस्य अशी पदके जिंकून स्पर्धा गाजवली. या सर्व पदक विजेत्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक बालाजी खंडागळे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच क्रीडा पर्यवेक्षक कीर्ती मोटे यांचे सहकार्य लाभले.

एन्ड्युरन्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष योगेश कोरे यांनी सर्व खेळाडू, ऑफीसिअल्स, पालक, प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचा अभिमानाचा क्षण आणखी खास बनला कारण खेळाडूंचा डॉ मैथिली तांबे आणि सत्यजीत तांबे यांच्या हस्ते सर्व पदक विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रोत्साहनाने आणि पाठिंब्याने संघाला मोठी प्रेरणा मिळाली. शाळेच्या मुख्याध्यापिका इंदिरा रामचंद्रन यांनी खेळाडूंचे कौतुक केले.