हर्सुल तलावावर भरली जलतरण साक्षरता मार्गदर्शनाची शाळा 

  • By admin
  • February 22, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या खुल्या जलशयात पोहण्याच्या मोफत मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिराची सुरुवात शानदारपणे झाली.

या प्रसंगी राजमाता जिजाऊ भोसले अकॅडमीच्या संचालिका नेहा वायभट, प्रशिक्षक कृष्णा पानखडे, रुपेश चौधरी आदी उपस्थित होते. पुरुषांच्या तुलनेत महिला पाण्याला जास्त घाबरतात असे लक्षात आल्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यात आले आहे.

जलतरण आवडते म्हणून किंवा थोडी फी वाचविण्याच्या प्रयत्नात अनमोल जीव धोक्यात घातला जातो. तरुणांनी विना माहिती, विना मार्गदर्शन, विना समुपदेशन विना शिक्षण, विना प्रशिक्षणा शिवाय आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून खुल्या जलस्त्रोतांमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना कृत्रिम व नैसर्गिक जलसाठ्यांविषयी अवगत करण्यात येत आहे.

पोहणे शिकण्यापूर्वी किंवा अचानक पोहण्याची इच्छा झाल्यास पाण्याच्या मोहाला बळी पडू नये. खुले जलस्त्रोत दिसायला नैसर्गिक दृष्ट्या जेवढे सुंदर,नयन रम्य, मनमोहक असतात. पण ते तेवढेच घातक, धोकादायक व जीवघेणे देखील असतात. जर त्यांची संपूर्ण माहिती आपल्याला नसेल तर आपल्या जीवाला धोका होतो हे निश्चित आहे. म्हणून माहिती महत्वपूर्ण ठरते.

हर्सुल तलाव हा पूर्वी शहरा बाहेर होता आज आपले ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगराची वाढ झपाट्याने झाल्यामुळे आता हा तलाव मानवी वस्तीच्या मध्यभागी आला आहे .पर्यटकांसह स्थानिक व इतर नागरिकांची खूप मोठी वर्दळ या ठिकाणी दिवसभर नव्हे तर वर्षाचे बाराही महिने असते. म्हणूनच या जलस्त्रोतांची संपूर्ण माहिती जसे की तो किती जूना आहे, त्याची लांबी-रुंदी-खोली, त्याचा संपूर्ण विस्तार, त्याचे वैशिष्ट, धोकादायक भाग कुठे आहे, खोली कुठे जास्त आहे, पाणथळ भाग कोणत्या बाजूस आहे इत्यादी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली जात आहे, असे जलतरण साक्षरता संकल्पनेचे प्रमुख राजेश भोसले यांनी दिली.

पाण्याच्या अगदी जवळ जाऊ नका, पाण्याच्या आसपास दंगा मस्ती टाळा,  एकमेकांना ढकलू नका, इतरांना पोहण्याचा आग्रह करू नका, फोटो, सेल्फी, रिल्सच्या नादी लागून धोका पत्करू नका, निसरड्या जागी जाऊ नका, तलावाच्या भितींवर चढू नका, चालू नका, पळू नका, तलावाच्या भितींवर जास्त वाकून बघू नका, अतिआत्मविश्वास दाखवू नका, इतरांना दाखवण्यासाठी पोहू नका, इतरांना पोहणे शिकविण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःची काळजी घ्या, इतरांना सुचित करा अशा विविध सूचना करत जलस्त्रोताविषयी सखोल माहिती राजेश भोसले यांनी यावेळी दिली.

जलस्त्रोतांविषयी विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्याचे कार्य जागतिक जलतरण साक्षरतेची संकल्पना मांडणारे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले हे सातत्याने करत आहेत. त्यांच्या समवेत राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या
पौर्णिमा भोसले, अंजुषा मगर, वंदना वाघमोडे तसेच विजय भोसले हे मदत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *