
नागपूर : पुणे येथे ५ ते १३ मार्च या कालावधीत होणाऱ्या २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ अंडर १६ महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी जान्हवी रंगनाथन हिची निवड करण्यात आली आहे.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या महिला निवड समितीने या स्पर्धेसाठी विदर्भ अंडर १६ महिला संघ जाहीर केला. या संघात जान्हवी रंगनाथन (कर्णधार), सायली सिंदे, सई भोयर, मानसी पांडे, प्रेरणा रणदिवे, रिद्धी नाईक, अक्षरा इटंकर, रुपाली सहारे, आयुषी ठाकरे, आदिती पालांदूरकर, वेदांती सालोडकर, तृप्ती लोडे, धारावी टेंभुर्णे, रिद्धिमा मरद्वार, मानसी बोरीकर, शगुफ्ता सय्यद या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच तन्वी मेंढे, सलोनी वानखेडे, श्रेया लांजेवार, यशश्री सोले या खेळाडूंची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
विदर्भ अंडर १६ महिला संघाच्या प्रशिक्षक म्हणून प्रियांका आचार्य आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सोनिया राजोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.