
नागपूर : ५२व्या राष्ट्रीय महिला व पुरुष वरिष्ठ कॅरम स्पर्धेसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे मुख्य संरक्षक गिरीश व्यास यांनी आतापर्यंत झालेल्या राज्य रॅकिंग कॅरम स्पर्धेच्या आधारे विदर्भ कॅरम संघ घोषित केला.
राष्ट्रयी पुरुष व महिला कॅरम स्पर्धा नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथे १७ ते २१ मार्च या कालावधीत होणार आहे. विदर्भ पुरुष संघात निलेश जाभुळकर, इर्शाद अहमद, गुरुचरण तांबे, निखिल लोखंडे, कुणाल राऊत, मोहनीश मेश्राम या खेळाडूंचा समावेश आहे. या संघाच्या व्यवस्थापकपदी तन्वीर अहमद खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भ महिला संघात दीप्ती बाथो, डिम्पल पराते, पौर्णिमा पराते, पुष्पलता हेडाऊ, माधवी निषाद, प्रार्थना तांबे या खेळाडूंचा समावे आहे. अनम तन्वीर खान यांची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती कण्यात आली आहे.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस व्ही डी नारायण यांची प्रमुख उपस्थिती होती. गिरीश व्यास, अर्जुन के आर यांच्या हस्ते नारायण यांचा सत्कार करण्यात आला. विदर्भ कॅरम संघटनेचे सचिव प्रभजीत सिंग बछेर यांनी प्रास्ताविक केले. संघ निवडीसाठी नवल मेश्राम, मोहम्मद इक्बाल, निशिकांत मेश्राम यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास डॉ सुरेश चांडक, अॅड कैलास व्यावस, किशोर पाटील, नरेश जुम्मानी, इम्रान जावेद आदी उपस्थित होते.