जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल संघाने पटकावले विजेतेपद 

  • By admin
  • February 23, 2025
  • 0
  • 37 Views
Spread the love

अंतिम सामन्यात विदर्भ इलेव्हनवर मात 

जळगाव :  पहिल्या जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेचे जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल संघाने विजेतेपद पटकावले. विदर्भ इलेव्हन बुलढाणा संघ उपविजेता ठरला. विजयी संघास २५ हजार रुपये रोख व उपविजेते संघास ११ हजाराचे पारितोषिक ट्रॉफीसह प्रदान करण्यात आले. 

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर तीन दिवसापासून सुरू असलेल्या पहिल्या जळगाव फुटबॉल चषक स्पर्धेचा अंतिम सामना विदर्भ इलेव्हन बुलढाणा आणि जळगाव फुटबॉल अकॅडमी यांच्यात झाला. अत्यंत चुरशीच्या या अंतिम सामन्यात खेळ संपेपर्यंत कोणताही संघ गोल करू शकला नाही. टाय ब्रेकरवर जळगाव फुटबॉल संघाने ४-३ ने विदर्भ संघाचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. 

तत्पूर्वी, उपांत्य फेरीच्या सामन्यात विदर्भ इलेव्हन बुलढाणा संघाने अमरावती टायटनचा ३-२ ने तर दुसऱ्या उपांत्य फेरीत जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमीने ईगल स्पोर्टिंग क्लब भुसावळचा २-० ने पराभव केला.

विजेत्या जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमी संघाला रोख २५ हजार व उपविजेत्या विदर्भ इलेव्हन बुलढाणा संघाला रोख ११ हजार रुपये व जळगाव फुटबॉल चषक देण्यात आला. 

पारितोषिक वितरण 
लोक संघर्ष मोर्चाच्या संस्थापक अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे, पोलिस उपनिरीक्षक भास्कर पाटील, डॉ मंदार पंडित, डॉ मनीष चौधरी, महावीर क्लासेसचे नंदलाल गादिया, मलिक फाउंडेशनचे नदीम मलिक, सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख, रूप रंग पेंटचे फारुक बीबा, पेंट पॉईंट इम्रान मलिक, नागोरी चहाचे जमीर नागोरी, स्पोर्ट्स हाऊसचे अमीर शेख, जळगाव स्पोर्ट्स अकॅडमीचे फारुक शेख, हॉकी महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रा अनिता कोल्हे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फारुख शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा अनिता कोल्हे, हिमाली बोरोले यांनी केले. अमृता चौधरी यांनी आभार मानले.

स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू

बेस्ट गोलकीपर : उत्कर्ष देशमुख ((जळगाव स्पोर्ट्स फुटबॉल अकॅडमी)

बेस्ट डिफेंडर : बॉबी सिंगाटे (ईगल स्पोर्टिंग भुसावळ)

बेस्ट मिड फिल्डर : मिराज खान (जळगाव स्पोर्ट्स)

बेस्ट स्टायकर : ब्रुनो (विदर्भ इलेव्हन बुलढाणा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *