
छत्रपती संभाजीनगर : देहरादून येथे आयोजित ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये एमजीएम विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचा ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक खेळाडू शुभम सरकटे याने सुवर्णपदक प्राप्त केले.
शुभम सरकटे याने सुवर्णपदक प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे आणि प्रशिक्षक प्रा प्रवीण शिंदे यांचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर यांनी सत्कार करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रसंगी अधिष्ठाता डॉ जॉन चेल्लादुराई, क्रीडा संचालक नितीन घोरपडे, क्रीडा विभाग प्रमुख डॉ दिनेश वंजारे, डॉ शशीकांत सिंग, डॉ सदाशिव जवेरी, डॉ श्रीनिवास मोतीयेळे, प्रा रहीम खान, निलेश खरे व सर्व संबंधित मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तराखंड येथील ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केली. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ५४ सुवर्ण, ७१ रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदकांची माळ आपल्या गळ्यात घातली. यंदाच्या स्पर्धेतील सर्वोत्तम राज्य विजेतेपदाचा मान हा महाराष्ट्रा राज्याला मिळाला आहे.