
महाराष्ट्र मास्टर बॅडमिंटन स्पर्धा
मुंबई : मुंबई येथे झालेल्या योनेक्स सनराइज महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन निवड चॅम्पियनशिप स्पर्धेत मुंबईच्या मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर या जोडीने दुहेरीचे उपविजेतेपद पटकावले.
मुंबईच्या मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर यांनी ६५ वर्षांवरील गटात दुहेरीचे राज्य उपविजेतेपद पटकाविले. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू व राष्ट्रीय बॅडमिंटन पंच विश्वास जस्वंदीकर यांच्या हस्ते मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांना रौप्यपदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर या जोडीने ठाणे येथील भालचंद्र पाटील व प्रणील आचरेकर यांना उपांत्य फेरीत २१-१२, २१-१३ असे हरवून अंतिम फेरीत गाठली. अंतिम फेरीत त्यांना गौतम आश्रा व महेश आरस यांनी २१-१२ व २१-१२ असे पराभूत केले. त्यामुळे त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मागील महिन्यात ठाणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन सिलेक्शन स्पर्धेत मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांनी विजेतेपद मिळविले होते. त्यामुळे मिलिंद पूर्णपात्रे व दिलीप सुखटणकर यांची महाराष्ट्र राज्यातर्फे ६५ वर्षांवरील पुरुष दुहेरीत पुढील महिन्यात होणाऱ्या मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत निवड झाली आहे.