
छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रवीण शिंदे आणि संदीप शिंदे या जोडीने विजेतेपद पटकावले.
दौलतरत्न क्रीडा मंडळातर्फे कन्नड तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित करण्यात आली होती. विनायकराव पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या इनडोअर हॉलमध्ये ही बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये कन्नड तालुक्यातून देवगाव रंगारी येथील खेळाडू सहभागी झाले होते.
या खेळाडूंनी डॉ कैलास मोती आणि अविनाश गायकवाड यांचा पराभूत करून विजय संपादन केला. यामध्ये देवगाव रंगारीचे खेळाडू अशोक गोसावी, भाऊसाहेब होलप, ईश्वर ठुबे, सचिन वेताळ व कन्नड येथील खेळाडू प्रवीण भदाणे, संतोष जंजाळ, संदेश राठोड, सचिन शेळके, चंद्रकांत कोळी, विवेक चिंचोले, सुरेश डोळस, विनोद कुमार साळुंकी, राहुल पाटणी, सुरज जाधव या खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवली.
या स्पर्धेत पंच म्हणून रवी कुमार सोनकांबळे, मुक्तानंद गोस्वामी आदींनी काम पाहिले. दौलतरत्न क्रीडा मंडळाचे अध्यक्ष दौलतराव शिंदे व खरेदी विक्री महासंघाचे अध्यक्ष सुरेश डोळस, माजी सरपंच राहुल पाटणी आदींनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन सन्मानचिन्ह देऊन गौरवले.