झेल टिपण्यात विराट कोहलीची विक्रमी कामगिरी

  • By admin
  • February 23, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

मोहम्मद अझरुद्दीनला टाकले मागे 

दुबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली फलंदाजी व्यतिरिक्त क्षेत्ररक्षणात देखील आपली छाप पाडतो. दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली याने एक विशेष कामगिरी केली आहे. कोहली भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक बनला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनला मागे टाकले आहे.

२२२ धावांच्या धावसंख्येवर मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पाकिस्तानला आठवा धक्का दिला. कुलदीपच्या चेंडूवर नसीम शाहने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण कोहलीने तो झेलला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नसीम १६ चेंडूत १ चौकारासह १४ धावा काढून बाद झाला. कोहलीने झेल घेताच त्याने अझरुद्दीनला मागे सोडले. कोहलीने आता एकदिवसीय सामन्यात १५७ झेल घेतले आहेत, तर अझरुद्दीनने भारतासाठी एकदिवसीय सामन्यात १५६ झेल घेतले होते.

जयवर्धने-पॉन्टिंग कोहलीच्या पुढे
एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण झेलांचा विचार केला तर कोहली या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापेक्षा जास्त झेल फक्त श्रीलंकेचा माजी खेळाडू महेला जयवर्धने आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी घेतले आहेत. जयवर्धनेने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीत २१८ झेल घेतले, तर रिकी पॉन्टिंगने १६० झेल घेतले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येच कोहलीला पॉन्टिंगला मागे टाकण्याची संधी मिळेल.

भारताकडून एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक झेल

विराट कोहली : १५७
मोहम्मद अझरुद्दीन : १५६
सचिन तेंडुलकर :१४० 
राहुल द्रविड : १२४
सुरेश रैना : १०२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *