प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे सपाटे मारण्याची भव्य स्पर्धा

  • By admin
  • February 24, 2025
  • 0
  • 12 Views
Spread the love

जुन्या परिपूर्ण व्यायामप्रकाराला उजाळा देण्यासाठी उपक्रम, विजेत्या व्यायामपटूंना रोख बक्षिसे

छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा येथील प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे १ मार्च रोजी भव्य ‘सपाटे मारणे’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वानखेडेनगरातील पांडे फार्म हाऊस येथे दुपारी चार वाजता स्पर्धेला सुरुवात होईल.

सपाटे मारणे हा एक परिपूर्ण असा जुना व्यायाम प्रकार आहे. यामध्ये जोर आणि बैठक एकाच वेळी मारली जाते. अनेक जुने पैलवान आजही सपाटे मारतात. हीच परंपरा जपली जावी, यासाठी प्रभाकर पांडे प्रतिष्ठानतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा ५ ते १०0 वर्ष बाल गट, ११ ते १८ वर्ष कुमार गट आणि १८ वर्षांपुढील खुला मोठा गट अशा तीन वयोगटात घेतली जाईल. विजेत्यांना रोख बक्षिसेही दिली जाणार आहेत. खुल्या गटाचे प्रथम २१ हजारांचे बक्षीस विनायक पांडे आणि ॲड गोपाल पांडे यांच्यातर्फे, द्वितीय ११ हजारांचे बक्षीस ज्ञानेश्वर जाधव, तर तृतीय ७ हजारांचे बक्षीस विलास अप्पा संभाहरे यांच्या वतीने देण्यात येणार आहे. कुमार गटाचे प्रथम ५ हजार रुपयांचे पारितोषिक पोलिस उपनिरीक्षक मोहन नंदवंशी, द्वितीय ३ हजारांचे बक्षीस सूरज नंदवंशी, तर तृतीय २ हजारांचे बक्षीस सतीश बरेटिये यांच्या वतीने देण्यात येणार आहे. बाल गटाचे प्रथम २१०० रुपयांचे पारितोषिक विपिन पांडे, द्वितीय ११०० रुपयांचे पारितोषिक संजय बरेटिये, तर तृतीय ५०० रुपयांचे बक्षीस परमेश्वर जैस्वाल यांच्या वतीने देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा शरद कचरे, डॉ हंसराज डोंगरे, डॉ फुलचंद सलामपुरे, डॉ रामेश्वर विधाते, डॉ मंगेश डोंगरे, अविनाश पवार, अर्जुन बरेटीये आणि अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळवली जाईल.

सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी रामेश्वर विधाते (9766777077), अविनाश पवार (9130522543), संदेश डोंगरे (8698138904), अर्जुन बरेटीये (8888984566) आणि सतीश बरेटिये (9764799503) यांच्याकडे नावनोंदणी करावी. बाहेरगावच्या स्पर्धकांची निवास व्यवस्था केली जाणार असून अधिकाधिक पहिलवान, कुस्तीपटू, खेळाडू आणि व्यायामप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष ॲड. आशुतोष डंख, सचिव प्रमोद झाल्टे, उपाध्यक्ष विलास अप्पा संभाहरे, विनायक (गणू) पांडे, ॲड गोपाल पांडे, ॲड संकर्षण जोशी, धैर्यशील घारे, ज्ञानेश्वर जाधव, रवींद्र माहूरकर, विष्णू गायकवाड, संजय फतेलष्कर, नागराज गायकवाड, दिवाकर जाधव, प्रदीप सोहनी, संतोष गुजराथी, संदेश वाघ, ॲड. निरंजन पांडे, विलास राऊत आदींनी केले आहे.

स्पर्धेची नियमावली

  • सपाटे योग्य रितीने मारणे, अर्धवट सपाटे मारणे चालणार नाही.
  • सपाटे मारणे सुरु केल्यानंतर कोणत्याही प्रकारे मध्ये ब्रेक घेता येणार नाही.
  • सपाटे स्पर्धेत सहभागी पहिलवानांना स्पर्धेदरम्यान काही दुखापत व इजा झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
  • पंचांचा निर्णय अंतिम व सर्वमान्य राहील.
  • सपाटे स्पर्धा सुरु झाल्यानंतर मध्ये थांबल्यास स्पर्धेतून बाद समजले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *