
अष्टपैलू रियांश गुप्ता सामनावीर
नागपूर : कर्णधार रियांश गुप्ताच्या अष्टपैलू कामगिरीमुळे एनसीए अ संघाने व्हीसीए अंडर १६ इंटर अकादमी वन-डे क्रिकेट स्पर्धा जिंकली.
एस. बी. सिटी कॉलेज मैदानावर खेळल्या गेलेल्या एका चुरशीच्या अंतिम सामन्यात एनसीए मुलांनी एसजीआर अकादमीला १९० धावांवर बाद केले आणि सात विकेट्स गमावून विजयी लक्ष्य गाठले.
गोलंदाजीत तीन विकेट्स घेणाऱ्या रियांशने नंतर २५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत सामनावीर किताब जिंकला. एसजीआर अकादमीच्या कश्यप पाटसकर याने सर्वाधिक ७४ धावा केल्या. त्याला एरोजू तक्षिल (५१) याने चांगली साथ दिली. एनसीएकडून रियांश, विराज माहेश्वरी आणि आयुष द्विवेदी यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या.
सलामीवीर अथर्व पटेलने ४३ धावा करत पाठलागाचा सूर निश्चित केला, तर अग्रण्य चॅटर्जीने ३३ धावांचे योगदान दिले. एनसीएने काही जलद विकेट्स गमावल्या तरी, शेवटच्या षटकात त्यांनी विजय मिळवला.
संक्षिप्त धावफलक
एसजीआर क्रिकेट अकादमी : ४३.५ षटकांत सर्वबाद १९० (कश्यप पाटसकर ७४, एरोजू ठकशील ५१, विराज माहेश्वरी ३-२५, रियांश गुप्ता ३-३६, आयुष द्विवेदी ३-४७).
एनसीए अ : ४९.४ षटकांत सात बाद १९१ (अथर्व पटेल ४३, अग्रन्या चटर्जी ३३, रियांश गुप्ता २५, अंश बागेश्वर नाबाद ३४, कश्यप पाटसकर ३-३७). सामनावीर : रियांश गुप्ता