
नागपूर : नागपूर येथे विदर्भ आणि केरळ यांच्यात रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी विदर्भ क्रिकेट संघटनेने अक्षय वाडकर याच्या नेतृत्वाखाली विदर्भ संघ जाहीर केला आहे.
विदर्भ आणि केरळ यांच्यात रणजी फायनल २६ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत होणार आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या वरिष्ठ निवड समितीने मुंबई संघाविरुद्ध उपांत्य सामन्यात विजय नोंदवणारा विदर्भ संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भ संघात अक्षय वाडकर (कर्णधार), अथर्व तायडे, अमन मोखाडे, यश राठोड, हर्ष दुबे, अक्षय कर्णेवार, यश कदम, अक्षय वखारे, दर्शन नळकांडे, नचिकेत भुते, सिद्धेश वाठ, यश ठाकूर, डॅनिश मालेवार, पार्थ रेखाडे, करुण नायर, ध्रुव शोरे अशा १७ खेळाडूंचा समावेश आहे.
विदर्भ संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये प्रशिक्षक उस्मान गनी, सहाय्यक प्रशिक्षक अतुल रानडे यांचा समावेश आहे.