
सातारा (नीलम पवार) : सातारा जिल्हा धनुर्विद्या संघटना व शिवांतिका आर्चर्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६व्या मिनी सब ज्युनियर जिल्हास्तरीय आर्चरी चॅम्पियनशिप स्पर्धेत कृतिका राहुल पवार हिने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत दृष्टी आर्चरी अकॅडमीची खेळाडू कृतिका राहुल पवार हिने चमकदार कामगिरी नोंदवत घवघवीत यश प्राप्त केले. या कामगिरीमुळे कृतिका पवारची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर व महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सचिन शेलार यांच्या हस्ते कृतिकाचा सत्कार करण्यात आला. कृतिका पवार हिला प्रवीण सावंत तसेच शिरीष ननावरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.