
छत्रपती संभाजीनगर : मनमाड येथे सुरू असलेल्या राज्य किशोर कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा कबड्डी संघ जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात छत्रपती संभाजीनगर संघाने सातारा संघावर मोठा विजय संपादन केला आहे.
महाराष्ट्र राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा किशोर गट मुले व मुलींचा संघ सहभागी झालेला आहे. मुलांच्या गटात पहिल्या सामन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर संघाने सातारा संघाचा ५०-३१ असा १९ गुणांनी पराभव करुन विजयाने सुरुवात केली.
या विजयामध्ये निशांत पाईकराव, अजित चव्हाण, ओंकार आढाव यांनी आपल्या चतुरस्त्र खेळामुळे चढाई व पकडीच्या जोरावर सातारा संघाला एकतर्फी लढतीत पराभूत केले. या यशामध्ये प्रशिक्षक वैभव गोरे, संघ व्यवस्थापक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष अजय पाथ्रीकर, सचिव डॉ माणिक राठोड, खजिनदार विजय वानखेडे, सदस्य विठ्ठल शेळके, ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ता आबा टेके तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व खेळाडू यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.