
सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदानाचे बुधवारी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते भूमीपूजन
छत्रपती संभाजीनगर : विभागीय क्रीडा संकुलात उभारण्यात येणाऱ्या फुटबॉल मैदानासह ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅकचे भूमीपूजन बुधवारी (२६ फेब्रुवारी) सामाजिक न्याय मंत्री पालकमंत्री आणि विभागीय क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
विभागीय क्रीडा संकुलात बुधवारी सकाळी नऊ वाजता भूमीपूजन सोहळा होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, राज्यसभा खासदार डॉ भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ कल्याण काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रशांत बंब, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरनारे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, आमदार विलास भुमरे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, विशेष पोलिस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी दिली.
या कार्यक्रमाला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खेळाडू, प्रशिक्षक, संघटक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवर प्राविण्य मिळवलेले खेळाडू, विविध शाळांचे विद्यार्थी, क्रीडा शिक्षक यांची उपस्थिती असणार आहे.