
सोलापूर जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
सोलापूर ः पुरुष व महिला गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत महिला गटात वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली व येथील किरण स्पोर्ट्स क्लबने अंतिम फेरीत प्रवेश केला.
ह दे प्रशालेच्या मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत उपांत्य सामन्यात किरण स्पोर्ट्स क्लब संघाने कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब संघाचा तर वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली संघाने येथील समृद्धी स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला.

पुरुष गटात किरण स्पोर्ट्स क्लब, फ्लाईंग स्पोर्ट्स क्लब पंढरपूर, न्यू गोल्डन मंद्रूप, उत्कर्ष क्रीडा मंडळ, ए एम स्पोर्ट्स डोणज, डीएनपी स्पोर्ट क्लब पिराचीकुरोली या संघांनी पहिल्या फेरीत आपापले सामने जिंकले आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने यांनी केले. यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशन अध्यक्ष महेश गादेकर, सरचिटणीस ए बी संगवे, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहखजिनदार सोमनाथ बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, राजेंद्र शितोळे, शरद व्हनकडे, संतोष कदम, अजित शिंदे, सचिन हार, वैभव लिगाडे, अर्जुन पवार, अमित कांबळे आदी उपस्थित होते. या स्पर्धेतून निवड समिती सदस्य धोंडीराम पाटील, विजय दत्तू व उमाकांत गायकवाड हे जिल्हा संघ निवडणार आहेत.
पंच म्हणून पुंडलिक कलखांबकर, लखन कांबळे, विजय अडगळे, श्रीकांत खटके, श्रीकांत चव्हाण नौशाद मुजावर, शिवशंकर राठोड, शेखलाल शेख, अनिकेत जाधव, श्रीकृष्ण कोळी, सागर बगले,अक्षय पवार, आनंद जगताप, सुरज शेवाळे, मधुकर राठोड हे काम पाहात आहेत.