सचिन लव्हेराचे दमदार शतक; शिवराज शेळकेची प्रभावी गोलंदाजी 

  • By admin
  • February 26, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

सेंट्रल झोन-किंग्ज स्पोर्ट्स क्लब सामना अनिर्णित 

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए सीनियर निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत सेंट्रल झोन आणि किंग्ज स्पोर्ट्स क्लब यांच्यातील चुरशीचा सामना अनिर्णित राहिला. कर्णधार सचिन लव्हेरा (१०४) याचे दमदार शतक हे सेंट्रल झोन संघाच्या पहिल्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. 

उरवडे क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. किंग्ज स्पोर्ट्स क्लब संघाने ५२.१ षटकात सर्वबाद २६५ धावसंख्या उभारली. सेंट्रल झोन संघाने ३९.४ षटकात सर्वबाद २२८ धावा काढल्या. त्यात कर्णधार सचिन लव्हेरा याने सर्वाधिक १०४ धावांचा वाटा राहिला. मात्र, इतर फलंदाज झटपट बाद झाल्याने सेंट्रल झोन संघ पहिल्या डावात आघाडी घेऊ शकला नाही. किंग्ज स्पोर्ट्स क्लबने ३७ धावांची आघाडी घेतली. 

किंग्ज स्पोर्ट्स क्लबने दुसऱया डावात ५५.१ षटकात आठ बाद २६२ धावसंख्या उभारुन डाव घोषित केला. त्यानंतर सेंट्रल झोन संघाने विजयासाठी प्रयत्न केला. परंतु, सेंट्रलग झोन संघाची २१ षटकात सात बाद ७८ अशी बिकट स्थिती झाली. मात्र, सेंट्रल झोन संघाने सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवले. 

या सामन्यात सचिन लव्हेरा व निश्चय नवले यांनी आक्रमक शतके ठोकली. सचिन लव्हेरा याने ८८ चेंडूत १०४ धावांची धमाकेदार खेळी साकारली. या शतकी खेळीत सचिनने सात उत्तुंग षटकार व दहा चौकार मारले. निश्चय नवले याने १०७ चेंडूत १०० धावांची आक्रमक खेळी केली. त्याने तीन षटकार व चौदा चौकार मारले. अभिजीत पवार याने ११९ चेंडूत ८६ धावा फटकावल्या. त्याने १३ चौकार मारले. गोलंदाजीत सार्थक वाळके याने ५७ धावांत सहा विकेट घेत आपला ठसा उमटवला. शिवराज शेळके याने ६५ धावांत पाच विकेट घेत चमकदार कामगिरी नोंदवली. गौरव शिंदे याने ५० धावांत चार गडी बाद केले. सचिन लव्हेरा याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *