
क्रीडा सह्याद्री फाऊंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
नाशिक : शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशन नाशिक व क्रीडा सह्याद्री निफाड व टेनिस क्रिकेट असोसिएशन नाशिक आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्य व राष्ट्रीय खेळाडूंना सरस्वती विद्यालय निफाड येथे शिवरत्न क्रीडा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी सरस्वती विद्यालयाचे चेअरमन नंदलाल चोरडिया, सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती बागडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैनतेय विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळकृष्ण ठोके हे होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विजय डेर्ले, राहुल कुलकर्णी, विनोद गायकवाड, शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष विलास गायकवाड, रमेश वडघुले, संजय बागुल आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शिव अविष्कार स्पोर्ट्स फाऊंडेशन अध्यक्ष विलास गायकवाड यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले व क्रीडा क्षेत्रामध्ये आपण करिअर करू शकता हे सांगितले. खेळाडूंचा सन्मान कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व प्रमुख पाहुणे बाळकृष्ण ठोके व विजय डेर्ले यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात अनंती आहेर, पियुषा अहिरे, पलक पवार, पूर्वा निकम, वेदश्री कापडणीस, नूतन काकुळते, जान्हवी नेरकर, वेदिका केकान, हर्षल ठोके, उत्कर्ष ठाकरे, श्लोक आहेर ,शिव ठोके, सोहम कापडणीस, आयुष भदाने, शौर्य चव्हाण, आयुष बागुल, आदित्य धारराव, खुशाल भामरे, करण रसाळ, साहिल प्रसाद, आर्यन खरे ,स्मित घुमरे, राम पाटील, प्रसाद पवार, साई हलवार, रितेश पाटील, रुद्राक्ष सोनवणे, साईराज गोजरे, वेदांत गुरव, सोहेल मुजावर, युवराज काळे, आदित्य पाटील, अभिजीत बोरसे, तेजस जोंधळे, मानवराजे वाघ, कार्तिक मोरे, विजय घोटेकर, श्लोक कुलकर्णी, दक्ष गायकवाड, अवदेश साह, जय डबाळे, ओम आहेर, सोहम मोरे, कार्तिक मोरे, आदित्य वाघ, सिद्धेश मेमाणे, रागिनी आहेर आदी खेळाडूंना शिव रत्न क्रीडा पुरस्कार, सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानाचा फेटा अशा स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच या खेळाडूंना महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव मीनाक्षी गिरी, क्रीडा सह्याद्री नाशिक अध्यक्ष विलास गायकवाड यांनी या सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम बेंडकुळे यांनी केले. विलास गायकवाड यांनी आभार मानले.